छगन भुजबळ-सुहास कांदे chhagan bhujbal-mla suhas kande
महाराष्ट्र बातम्या

आमदार सुहास कांदे यांच्यासोबतचा वाद मिटलाय? भुजबळांनी दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार सुहास कांदे (MLA Suhas kande) यांनी मंत्री छगन भुजबळ (minister chhagan bhujbal) यांच्यावर केला होता. त्यानंतर या वादामध्ये अंडरवर्ल्ड डॉनची एन्ट्री झाली. त्याची चौकशी करावी, असे छगन भुजबळ म्हटले होते. मात्र, आता हा वाद कुठे थांबणार? असा प्रश्न विचारण्यात आला असता छगन भुजबळ यांनी त्याला उत्तर दिले आहे.

'कोणावरही चुकीचे आरोप लावणे आणि कलगीतुरा निर्माण करणे हे थांबले पाहिजे. माझ्या दृष्टीने हा वाद इथेच संपला आहे. त्यावर आता जी काही चर्चा करायची आहे ती मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात करू', असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, आमदार सुहास कांदे यांना छगन भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पुतण्याचा फोन आल्याचा आरोप आमदार कांदेंनी केला होता. त्याबाबत छगन भुजबळ यांनी बोलण्याचं टाळलं. मी आता यावर काहीही बोलणार नाही. कोणाला काहीही सांगत नाही. त्यांना जे करायचं आहे ते करतील, असे ते म्हणाले.

गुलाबराव पाटील म्हणाले, बालकांनी पालकांना त्रास देऊ नये आणि पालकांनी बालकांना देखील त्रास देऊ नये. ते समजदार आहेत. त्यांचं मला पटलेलं आहे. पालकांनी आणि बालकांनी देखील घरातील वाद चव्हाट्यावर आणू नये. असे वाद चव्हाट्यावर आणण्याचे दोघांनाही अधिकार नाहीत. तसेच आमच्या महाविकास आघाडी पक्षामध्ये कुठलाही वाद नाही. स्थानिक स्तरावर थोडा वाद होता. मात्र. तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असेही भुजबळ म्हणाले.

नेमका काय आहे प्रकरण? -

विकासकामाच्या आढावा बैठकीत यापूर्वी शिवसेना आमदार सुहास कांदे व छगन भुजबळ यांच्यात वाद रंगला होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचा विनियोग नीट केलेला नाही. तसेच, दहा कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप आमदार कांदे यांनी केला आहे. याच संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीतर्फे आलेल्या निधीच्या असमान वाटपावरुन उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट याचिका मागे घ्या, अन्यथा तुमचे व कुटुंबियांनी चांगले होणार नाही, अशी धमकी छोटा राजन टोळीकडून देण्यात आल्याचे आमदार सुहास कांदे यांनी म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT