राज्यातील परिस्थिती बिघडली असती तर, किरीट सोमय्या दिल्लीला जाऊ शकले नसते
सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण कलुशित करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा विरोधक करत आहेत. भाजप म्हणजे जनता आहे का? राष्ट्रपती राजवट लागू करणे इतके सोपे आहे का, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला केला आहे. आज ते नाशिकमध्ये बोलत होते. राज्यातील परिस्थिती बिघडली असती तर, किरीट सोमय्या दिल्लीला जाऊ शकले नसते, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे. (Chhagan Bhujbal Latest Marathi News)
यावेळी भुजबळ यांनी भाजप नेत्यांसह राणा दाम्पत्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, किरीट सोमय्या यांना पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. तरीही सोमय्या पोलिस स्टेशनमध्ये गेले. दगडफेकीनंतर त्यांचे रक्त खाली उतरतही नव्हते, तरी सौमय्या ते रक्त पुसत नव्हते असा टोलाही भुजबळांनी सोमय्या यांना लगावला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, तरीही वातावरण खराब करून राष्ट्रपती लागू करा अशी एकमुखी मागणी भाजप नेते करत आहेत. दिल्लीत गोळीबार झाला तेव्हा काय झाले होते, याची आठवणही भुजबळांनी यावेळी करून दिली.
पुढे ते म्हणाले, शिवसेनेला डिवचणे योग्य नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घरातच मुस्लिमांना नमाज पठण करायला जागा उपलब्ध करून दिली होती हे भाजपाने विसरु नये. हा श्रद्धेचा विषय असतानाही त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेने लता मंगेशकर असताना त्यांना मोठी मदत केली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरस्कार वितरणात बोलावणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवणे महत्त्वाचे असल्याचा टोलाही त्यांनी मंगेशकर कुटुंबाला लगावला आहे.
पोलिसांनी अटक केल्यानंतर आपण मागासवर्गीय असल्यामुळे पोलिसांनी आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप खासदार राणा यांनी केल्यानंतर भुजबळ यांनी राणांना टोला लगावला. सरकार आणि पोलिसांमध्येही मागासवर्गीय आहेत. कायदा सर्वांना सारखाच असून कारवाई झाली की स्वत:ला मागासवर्गीय म्हणणे चुकीचे आहे. मुळात नवनीत राणा मागासवर्गीय आहेत की नाही यावरच प्रश्नचिन्ह आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.