Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal sakal
महाराष्ट्र

'पवारांच्या घरचं वातावरण पुरोगामी, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहूदे'

सकाळ डिजिटल टीम

'कोणत्याही बेकायदेशीर वास्तूंवर, कामांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहेत ना?'

सध्या राज्यात नेतेमंडळींचं वाक् युद्ध पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते आणखीन वाढत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर विविध आरोपही केले आहेत. दरम्यान, विरोधकांना काय आरोप, तक्रार करायची ती करु द्या. कुठल्याही बेकायदेशीर वास्तूंवर, कामांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहेत ना? तरीही न्याय मिळाला नाही तर न्यायालय आहेच त्यामुळे आम्ही घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी दिली आहे.

गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी भुजबळ म्हणाले, शरद पवारांवर अशा प्रकारचे आरोप का करावेत हे कळत नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारानेच जात त्यांनी काम केलं आहे. त्यांचे घरचे वातावरण पुरोगामी आहे. आतापर्यंत सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांनी काम केलं आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या. पडळकरांनी (Gopichand Padalkar) हा विचार करावा की, पवारांनी नेहमीच मनुवादाला विरोध केला आहे.आधीही बेकायदेशीर कामावर कारवाया झाल्या आहेत. पण इतका गाजावाजा नव्हता. मागासवर्गीय आयोगाने जे रिपोर्ट दिले होते तेच सुप्रीम कोर्टाने फेटाळले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पुढे भाजपाचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या एका प्रश्नावर प्रतित्त्युर देताना ते म्हणाले, भाजपाला काय आरोप करायचे, तक्रार करायची ती करु द्या. कुठल्याही बेकायदेशीर वास्तूंवर, कामांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहेत, तरीही न्याय मिळाला नाही तर कोर्ट आहे ना?, त्यामुळे आम्ही घाबरणार नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress: या मतदारसंघात काँग्रेस करतंय चक्क 'नोटा'चा प्रचार, काय आहे कारण?

Look Younger: मेकअप आणि सर्जरी न करता त्वचेला तरुण ठेवण्यासाठीचे ५ सोपे मार्ग

Devendra Fadnavis: ...त्यामुळं मोदींनी पवार-ठाकरेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही; फडणवीसांचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: "या देशातून आता पुन्हा स्थलांतर होणार नाही"; ओवैसींचा मोदी-शहांवर हल्लाबोल

Mahavitaran : महावितरणकडे आता चॅट बॉटद्वारे तक्रार नोंदवता येणार

SCROLL FOR NEXT