Sharad Pawar Chhagan Bhujbal Meeting Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? शरद पवार यांच्या भेटीसाठी भुजबळ सिल्वर ओकवर

Sharad Pawar: अलिकडे राज्यासभेसाठीही भुजबळ उत्सुक होते. पण सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आल्याने भुजबळांची संधी हुकली होती.

आशुतोष मसगौंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहे. भुजबळ सिल्वर ओकवर पोहचल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भुजबळ-पवार यांच्या या भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहे.

दरम्यान भुजबळ शरद पवार यांना भेटायला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांचे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

भेट कशासाठी?

बारामती येथे रविवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सभा झाली. या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, "बारामतीतून फोन गेल्यामुळे आरक्षणाच्या संदर्भातील सर्वपक्षिय बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आले नाहीत. वास्तविक शरद पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा या बैठकीला यायला हवे होते."

दरम्यान छगन भुजबळ यांच्या या टीकेमुळे शरद पवार नाराज झाले आहेत. त्यामुळे भुजबळ त्यांच्या भेटीला गेल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

भाजपची प्रतिक्रिया

पवार-भुजबळ यांच्या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील भेट महाराष्ट्रात होत असलेल्या सामाजिक घडामोडींना अनुसरून असू शकते, आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतः सांगतील की त्यांनी पवार यांची भेट का घेतली."

"छगन भुजबळ हे महायुतीचे मोठे नेते आहेत. त्यामुळे महायुतीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होईल असे कुठलेही पाऊल उचलणार नाहीत शरद पवार यांची भेट घेणे यात काहीही गैर नाही. आम्हीही अनेकदा त्यांना भेटत असतो, त्यामुळे भुजबळ कोणताही निर्णय घेतील असे मला वाटत नाही," असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

महायुतीत भुजबळ नाराज?

महायुतीत सहभागी झाल्यापासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या सतत येत असतात. अशात लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून लढण्यासाठी भुजबळ उत्सुक होते. पण शिंदे यांच्या शिवसेनेच्या आग्रहामुळे राष्ट्रवादीला ही जागा मिळाली नाही आणि त्यांची लकोसभा लढवण्याची संधी हुकली. अलिकडे राज्यासभेसाठीही भुजबळ उत्सुक होते. पण सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आल्याने भुजबळांची संधी हुकली होती. त्यामुळे भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार अशा चर्चा सतत सुरू असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT