Mukkarab Khan Death Story : छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची चर्चा आजकाल तरुणाईत खूप जोरात सुरू आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'छावा' या चित्रपटामुळे संभाजीराजांच्या पराक्रमाची गाथा पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे. या चित्रपटात संभाजीराजांच्या जीवनाचा आणि त्यांच्या संघर्षाचा सजीव पट आणण्यात आला आहे. पण संभाजीराजांना पकडणाऱ्या मुकर्रब खानच्या इतिहासाची कहाणी अजूनही अनेकांना माहीत नाही. आज आपण याच मुकर्रब खानच्या शेवटाबद्दल जाणून घेऊया.
सन १६८९ मध्ये संभाजीराजांना औरंगजेबाने प्रचंड यातना देऊन त्यांची हत्या केली. यानंतर मराठी मुलूख पेटून उठला होता. औरंगजेबाच्या लाखो सैन्याने मराठा राज्यात जागोजागी तळ ठोकली होती. पण मराठ्यांनी हात टेकले नाहीत. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे नेतृत्व राजाराम महाराजांनी स्वीकारले आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी मराठा सेना पराक्रमाने लढू लागली.
या काळात कोल्हापूर आणि कोकणच्या भागात मुघल सरदार मुकर्रब खानचा प्रभाव होता. संभाजीराजांना पकडण्यात मुकर्रब खानचा मोठा वाटा होता. त्यामुळे मराठ्यांनी त्याचा बदला घेण्याचा निर्धार केला. सेनानी संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मुकर्रब खानवर हल्ला चढवला. नोव्हेंबर-डिसेंबर १६८९ मध्ये झालेल्या या लढाईत मराठ्यांनी मुकर्रब खानला उभा कापून काढायचा निर्धार केला होता.
मुकर्रब खानच्या सैन्याची संख्या मोठी होती पण मराठ्यांनी लढा दिला. मावळ्यांनी मुकर्रब खानवर धाड घातली आणि संताजी घोरपडे यांनी स्वतः त्याच्यावर वार केला. लढाईत मुकर्रब खान रक्तबंबाळ झाला आणि मुघल सैन्याने त्याला डोंगरदऱ्यातून नेत पळ काढला. यानंतर मुकर्रब खानचा कोठेही उल्लेख आढळत नाही. ज्यावरून असे लक्षात येते की त्याचा खात्मा झाला होता.
मुकर्रब खानचा बदला हा औरंगजेबाच्या मुघल सैन्याला मोठा झटका होता. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य त्यांचे बलिदान पचवू शकेल, अशी अपेक्षा ठेवलेल्या औरंगजेबाला या घटनेने मोठा धक्का बसला. मुघलांच्या खास सरदारांनीही मुकर्रब खानचा बदला मराठ्यांनी घेतल्याचे वास्तव लपवण्याचा प्रयत्न केला.
हा इतिहास आजही अनेकांना माहीत नाही पण मराठ्यांनी कोल्हापूरच्या मातीत मुकर्रब खानचा खात्मा करून स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला पराक्रम अभिमानास्पद आहे. 'छावा' चित्रपटामुळे संभाजीराजांच्या इतिहासाकडे लक्ष वेधले गेले आहे पण मुकर्रब खानच्या शेवटाची ही कहाणीही तितकीच महत्त्वाची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.