Chhatrapati Sambhajinagar municipal commissioner birth day subscription of two lakhs  
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! शहरात 10 दिवस पाणी नसताना आयुक्ताच्या वाढदिवसासाठी अडीच लाखांची वर्गणी

सरकारी जाहिरातींवर होणाऱ्या खर्चावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे

धनश्री ओतारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी जाहिरातींवर होणाऱ्या खर्चावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे एका शहरात 10 दिवस पाणी नसताना आयुक्ताच्या वाढदिवसासाठी अडीच लाखांची वर्गणी काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.( Chhatrapati Sambhajinagar municipal commissioner birth day contribution of two lakhs )

छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आयुक्तांचा वाढदिवस कर्मचाऱ्यांकडून थाटात साजरा करण्यात आला. शहरात 10 दिवस पाणी नसताना वाढदिवसावर अडीच लाख खर्च केल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

आयुक्ताच्या वाढदिवसासाठी अडीच लाखांची वर्गणी

छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. यासाठी मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जवळपास अडीच लाखांची वर्गणी देखील काढल्याची देखील चर्चा आहे.(Latest Marathi News)

स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट, त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा, शानदार फेटे, सुंदर रांगोळी, जेवणासाठी उत्तम पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा असं दृश्यं संभाजीनगरमध्ये काल पाहायला मिळालं. (Marathi Tajya Batmya)

नागरिक संतप्त

संभाजीनगर शहराच्या अनेक भागांमध्ये दहा-दहा दिवस पाणी येत नाही.हीच तत्परता जर शहराच्या समस्या सोडवण्यात दाखवली, तर काही महिन्यांत संभाजीनगर शहराचा चेहरामोहराच बदलून जाईल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT