Sanjay Raut Sambhajiraje Chhatrapati Shahu Maharaj
Sanjay Raut Sambhajiraje Chhatrapati Shahu Maharaj Sakal
महाराष्ट्र

वडिलांच्या भूमिकेमुळे संभाजीराजेंची कोंडी? राऊत शाहू महाराजांना भेटणार

सकाळ डिजिटल टीम

संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आता ते छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. संभाजीराजेंऐवजी दुसऱ्या उमेदवाराला राज्यसभेची उमेदवारी देऊन शिवसेनेने राजघराण्याचा अपमान केला, असा आरोप सातत्याने शिवसेनेवर होत होता. मात्र शाहू महाराजांनी हे आरोप फेटाळले आणि हे राजकारण आहे, घराण्याचा अपमान होत नाही, अशी भूमिका घेतल्याने संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. (Sanjay Raut going to visit Chhatrapati Shahu maharaj in Kolhapur)

संजय राऊत (Sanjay Raut) आज कोल्हापुरातल्या न्यू पॅलेस इथं शाहू महाराजांची भेट घेणार आहेत. भाजपाने संभाजीराजेंचा गैरवापर केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तर संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज यांच्या भूमिकेमुळे संभाजीराजेंची (Sambhajiraje Chhatrapati) काहीशी कोंडी झाल्याचं दिसतंय. संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या भाषणात संजय राऊतांनी शाहू महाराजांच्या भूमिकेवरही भाष्य केलं होतं. त्यानंतर आता संजय राऊत आणि शाहू महाराजांमधल्या या भेटीने राजकीय खळबळीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली?

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझा आणि मुख्यमंत्र्यांचा कच्चा ड्राफ्टही तयार झाला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी यु-टर्न घेतला, असा गंभीर आरोप संभाजी महाराजांनी केला होता. आपल्या स्वाभिमानासाठी आपण माघार घेतली असल्याचंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं होतं. तर छत्रपती घराण्याचा शिवसेनेने अवमान केल्याचं भाजपा सातत्याने बोलून दाखवत होतं. या सगळ्यावर संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज यांनी भाष्य केलं आहे.

शाहू महाराज म्हणाले, "घराण्याचा काही संबंध तिथं आला नाहीये. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. आमच्यात विचारविनिमय झाला असता, मी त्याला संमती दिली असती किंवा नसती, काहीही झालं असतं, माझ्यापर्यंत आलं असतं, तर विषय वेगळा असता. घराण्याचा अपमान वगैरे काही नाही, हे राजकारण आहे. आपण घोषणा केल्यानंतर सगळे पाठिंब्यासाठी आपल्याकडे पळत येतील, हे कॅल्क्युलेशन चुकलं. राजकारणात असं एकदम काही होत नाही. विचारविनिमय अनेक तऱ्हेचे असतात. ते सगळे करायच्या आधी त्यांनी घोषणा केली, आणि अपेक्षा केली की सगळ्यांनी माझ्याकडे पळत यावं. "

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT