Chhatrapati Shivaji Maharaj esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचं पहिलं शिल्प या शूर महिलेनं बनवलं होतं, वाचा गौरवशाली इतिहास

दक्षिणेकडील म्हैसूर, बंगळूर, कुर्ग, लक्ष्मीश्वर यासारखी राज्ये मराठ्यांची सहकारी झाली.

धनश्री भावसार-बगाडे

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary : दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांच्या हाती असावी, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. हैदराबादच्या भागानगरच्या कुतुबशाहने त्यांचा मोठा सन्मान केला. वेल्लोर, जिंजी, मदुराई याठिकाणी स्वराज्य विस्तारले. व्यंकोजीराजांची भेट झाली. मनाप्रमाणे राजकारणे झाली. दक्षिणेकडील म्हैसूर, बंगळूर, कुर्ग, लक्ष्मीश्वर यासारखी राज्ये मराठ्यांची सहकारी झाली.

जानेवारी १६७८मध्ये धनाजी जाधव यांनी उत्तर कर्नाटकातील बेलवडी जवळील काही गावे लुटली. कारण येथील राज्यकर्ता ईशाप्रभू मराठ्यांना अनुकूल नव्हता. उलट त्याने धनाजी जाधव यांच्यावर आक्रमण केले. धनाजीची ताकद मोठी होती. ईशाप्रभू जखमी झाला आणि त्यातच त्याचा अंत झाला.

मल्लम्मांचा मराठ्यांवर हल्ला

आता बेलवडीची सूत्रे ईशाप्रभूची पत्नी मल्लम्मा हिच्याकडे आली. नवऱ्याच्या मृत्यूमुळे तिच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष उत्पन्न झाला. ती अतिशय शूर होती. महिलांची पलटण तयार करण्याचे काम मल्लम्माने केले. तिने मराठ्यांच्या तळावर आक्रमण केले आणि मराठ्यांच्या अनेक सैनिकांना मारले, जखमी केले. जाताना शंभर बैल घेऊन ती बेलवडीच्या गढीत गेली.

आता मात्र मराठे रागावले आणि बेलवडीवर आक्रमण करण्यासाठी मराठेशाहीतील सरदार सखुजी गायकवाड यांना पाठवले. त्यांनी गढीवर हल्ला केला. मल्लम्माची पलटण मोठ्या हिमतीने लढत होती. परंतु अचानक मल्लम्मा सखुजींच्या हाती सापडल्या.

बनवले शिवरायांचे शिल्प

मल्लम्माला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभे करण्यात आले. महाराज त्यांना म्हणाले की, ‘‘आम्ही स्वराज्य निर्माण करतोय आणि आपण आम्हाला विरोध करताय?’’ यावर ती स्त्री खंबीरपणे म्हणाली, ‘‘तुमच्या लोकांकडून तरी कुठे स्त्रियांचा सन्मान होतोय?’’ हे ऐकताच महाराज विचारात पडले. चौकशी केली आणि लक्षात आले, सखुजी गायकवाड दोषी आहेत.

लगेच आदेश दिला, ‘‘ज्या वाईट नजरेने सखुजीने मल्लम्माकडे पाहिले, ते दोन डोळे काढून टाका.’’ आणि मल्लम्माला तिचे संपूर्ण राज्य परत दिले. स्वराज्यातील आणखी दोन गावेही तिच्या सव्वा वर्षाच्या मुलाच्या दुधभातासाठी दिली. मल्लम्माच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फार मोठी भक्ती निर्माण झाली. स्वतःच्या राज्यात परत गेल्यानंतर यादवाडजवळ तिने छत्रपती शिवाजी महाराजांची दोन शिल्पे कोरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT