Anand Dave Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"मुस्लीम शिवजयंतीला येतात का? छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचेच राजे"

महाराजांना सेक्युलर समजणाऱ्या प्रत्येक फेक्युलरचे सर्व मुद्दे सहज खोडून काढता येतील अशी कागदपत्रे आज सुद्धा उपलब्ध असल्याचं आनंद दवे म्हणाले.

सुधीर काकडे

हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) सेक्युलर ठरवून काय उपयोग? इतर धर्मीय तसं समजतात का? असा सवाल ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना दवे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले आनंद दवे...

मुस्लिम लोक शिवजयंती ला येतात का? किती मशीदित महाराजांचे फोटो आहेत? असा सवाल करत, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हिंदवीच आणि हिंदूंसाठीच असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक किल्ल्यावर मंदिर बांधणाऱ्या राजांनी पूर्ण कारकिर्दीत एकही मशीद बांधली नाही. कोणत्याही मशीदीला नवीन इनामे दिली नाहीत. महाराजांनी इनाम बंद केल्याचं पुरंदरच्या काझींचं लेखी पत्र आजही उपलब्ध आहेत. गोव्यातील मशीद पाडून पुन्हा तेथे सप्तकोटिश्वर चे मंदिर बांधले, तसेच अगदी तिकडे तामिळनाडूत सुद्धा केले. कल्याण, डोंबिवली येथील चर्च चे गोडाउन मध्ये रूपांतर केल्याचं फ्रायर च्या अंकात नमूद केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम धर्माची वाट लावली असं आदिल शाहचं कन्होजी जेधेंना पत्र आहे. आत्ता हे हिंदू राष्ट्र झालं आहे : हाडकोरण या गावात शिलालेख आहेत. नेताजी पालकर, बाबाजी निंबाळकर यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. स्वराज्य स्थापनेनंतर 1658 पासून एक सुद्धा मुस्लिम सैनिक सैन्यात नव्हता. महाराजांना सेक्युलर समजणाऱ्या प्रत्येक फेक्युलरचे सर्व मुद्दे सहज खोडून काढता येतील अशी कागदपत्रे आज सुद्धा उपलब्ध आहेत.

दरम्यान, हिंदूच नाही तर देशातील कोणत्याही धर्माचा, कोणताही नागरिक आज सुद्धा महाराजांना हिंदू राजाच मानतो असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिकचा फैसला उद्या! १२२ जागांसाठी ७३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये होणार बंद

ODI Rankings: किंग इज बॅक! विराट रोहितला मागे टाकत पुन्हा सिंहासनावर विराजमान, कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रमही केला

Viral Video : आयुष्यात पहिल्यांदाच आजी-आजोबांनी पाहिला समुद्र; पायांना लाटा स्पर्श होताच त्यांच्या चेहऱ्यावर.., भावनिक क्षण पाहून नेटकरी म्हणाले...

Ichalkaranji Election : केंद्र–राज्य सरकारच्या निधीतून इचलकरंजीचा सर्वांगीण विकास आमदार राहुल आवाडे

World Archery Championship: साताऱ्याच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड; जागतिक तिरंदाजी स्पर्धा; साहिल, ओजस, मधुरा, आदितीचा समावेश!

SCROLL FOR NEXT