Eknath Shinde CM Sakal
महाराष्ट्र बातम्या

गाडीतूनच CM शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन; हिंगोली पुराचा घेतला आढावा

मुख्यमंत्री शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना तसंच विविध नेत्यांना ते भेटत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये ते भाजपा पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, राज्यात हिंगोली जिल्ह्यात आसना नदीला पूर आल्याची स्थिती आहे. या परिस्थितीचा आढावा एकनाथ शिंदेंनी आज घेतला आहे. त्यांचा व्हिडीओही समोर आला आहे. (Eknath Shinde Hingoli Flood News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्ली दौऱ्यावर असून हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून फोनद्वारे घेतली.पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही याला प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रवासात असतानाच शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत हा आढावा घेतला आहे.

हिंगोली (Hingoli Rain) जिल्ह्यात मागील चोवीस तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ६६.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर कयाधु, आसना, जलेश्वर या नद्यांना पुर आला आहे. या पावसाने पिकांचे नुकसान देखील झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कुरुंदा मंडळात १७९.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT