Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: शहाजी बापू पाटील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात, CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

Eknath Shinde: सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन शहाजीबापू पाटील यांची चौकशी केली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन शहाजीबापू पाटील यांची चौकशी केली. नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती.

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गुडघ्यावरती शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपल्या मुळ गावी दरे येथे होते. शहाजीबापूंवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी फोनवरून चौकशी केली होती. त्यानंतर आज त्यांनी ब्रीच कॅण्डी रूग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेऊन विचारपुस केली.

त्याचबरोबर मुख्यमंत्री डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली होती. त्या वेळी शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचे कामही शहाजी पाटील यांनी केले होते. त्यानंतर ते काय झाडी काय डोंगर या त्यांच्या वक्तव्यामुळे ते जोरदार चर्चेत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT