Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: रात्रीस बैठका चाले! वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत तीन नेत्यांमध्ये खलबतं; CM शिंदे आज करणार मोठी घोषणा?

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये वर्षा या शासकीय निवास्थानी काल मध्यरात्री बैठक झाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक तब्बल तीन तास चालली आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर तब्बल एक तास नऊ मिनिटांनी अजित पवार दाखल झाले आणि एक तास आगोदरच मिटिंग संपवून ते आपल्या देवगिरी निवासस्थानी रवाना झाले. (Latest Marathi News)

दरम्यान, या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर चर्चा झाल्याची माहीती समोर आली आहे. दरम्यान या तीन तांसाच्या बैठकीत खाते वाटपासंदर्भातही चर्चा झाल्याची माहीती आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री महत्त्वाची बैठक पार पडली.(Latest Marathi News)

या बैठकीयाठी अजित पवार एक तास उशिरा पोहोचले आणि एक तास आगोदर मिटिंग संपवून आपल्या देवगिरी निवासस्थानी परतले. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक तास 23 मिनिटे बैठकीला हजर होते. अजित पवार गेल्यानंतर तासाभरानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर या निवासस्थानी परतले.(Latest Marathi News)

तर अजित पवार यांच्या महायुतीत आल्याने शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली. अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार करावा, अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे.(Latest Marathi News)

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी सोमवारी मध्यरात्री खलबतं झाली आहेत. यावेळी तिन्ही बड्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT