Eknath Shinde eSakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: NDAच्या बैठकीत एकनाथ शिंदेंची हवा; मुख्यमंत्र्यांच्या शेरोशायरीला उपस्थितांची भरभरुन दाद

Eknath Shinde on Narendra Modi: लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर आता NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदींना यावेळी एकनाथ शिंदेंनी शेरोशायरीतून पाठिंबा दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी निवड करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपधविधी पार पडणार आहे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्यावर गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन दिलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं.

त्याचबरोबर एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमताने निवड केली आहे. राजनाथ सिंह यांच्या मागणीला आमच्या पक्षाकडून समर्थन देत असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. अनेकांनी देशाच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, अफवा पसरवणाऱ्यांना जनतेने नाकारलं आणि मोदी यांना स्वीकारलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

शिवसेना-भाजपची युती हा 'फेविकॉल का जोड', तो कधीही तुटणार नाही. नरेंद्र मोदींनी केलेलं काम देशाने पाहिलं आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कारण आज नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षात मोदी यांनी या देशाचा विकास केला. या देशाला पुढे नेले. या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. या देशाला नवी ओळख देण्याचे काम केले. मी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा देतो, असंही पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

एकनाथ शिंदेंनी म्हटली शेरोशायरी

मैं उस माटी का वृक्ष नहीं

जिसको नदीयों ने सीचा हैं

बंजर माटी मैं पलकर मैने मृत्यू से जीवन खींचा हैं

मैं पत्थर पर लिखी इमारत हुं, शिसे से कबतक तोडोगे

मिटनेवाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे

असा शेरोशायरी मुख्यमंत्री शिंदेनी यावेळी ऐकवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT