Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

maharashtra politics शिंदेगट स्वतंत्र कामगार संघटना काढणार; शिवसेनाला देणार टक्कर

शिवसेनेच्या भारतीय कामगार संघटनेच्या धरतीवर शिंदे गटाने नवी रणनिती आखली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या भारतीय कामगार संघटनेच्या धरतीवर शिंदे गटाने नवी रणनिती आखली आहे. शिंदे गट आता स्वतंत्र कामगार संघटना काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात कामगार क्षेत्रातही शिंदे गट उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Chief Minister Eknath Shinde will start new labor union )

कामगार क्षेत्रातही शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शिंदे गट मैदानात उतरला आहे. नव्या कामगार युनिअन उभारण्याची जबाबदारी शिंदे गटाने किरण पावसकर यांच्याकडे दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

किरण पावसकर यांनी कामगार संघटना चालवण्याचा अनुभव आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीतही त्यांनी कामगार संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिंदे गटानेदेखील पावसकर यांच्याकडे कामगार युनिअनची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय कामगार सेनेचं महत्त्व काय?

भारतीय कामगार सेनेला टक्कर देण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. भारतीय कामगार सेना शिवसेनेचं अविभाज्य अंग आहे. हॉटेल, रुग्णालयं मोठ्या उद्योगांमध्ये ६५० शाखा भारतीय कामगार सेनेच्या आहेत. ६५० पैकी ५२५ शाखांना कंपनी व्यवस्थापनाची मान्यता आहे. भारतीय कामगार सेना महासंघाचे ३ लाख सदस्य आहेत. रेल्वे, विमानतळ, टेलीकॉम, ऊर्जा या क्षेत्रात भारतीय कामगार सेनेचा दबदबा आहे.

तसेच, मतदारांपर्यत पोहचण्यासाठी कामगार सेनेचा मोठा वाटा आहे. व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांसाठी वेगळी संघटना. स्थानिक लोकाधिकार हक्क संघटनेत ७५ हजार सदस्य आहेत. बँका, विमान कंपन्यामध्ये सेना युनिअनचा दबदबा पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT