Raj-Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरे यांच्या ई-मेलला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी राज ठाकरेंनी केला होता ई-मेल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं त्यांना दिलासा देताना तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल करुन केली होती. त्यांच्या या ई-मेलची दखल मुख्यमंत्री कार्यालयानं घेतली असून त्यांच्या मागणी संबंधीत विभागाकडे पाठवण्यात आल्याचं त्यांना सांगण्यात आलं आहे.

आज अर्थात ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला याबाबत ई-मेल केला होता. यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना ५०,००० हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची मागणी केली होती. यानंतर पंचनाम्यांचे सोपस्कर पार पाडा असंही ई-मेलला जोडलेल्या मनसेच्या पत्रकात म्हटलं होतं.

आधी कोरोनाची स्थिती आणि त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळं शेतकरी कोसळला आहे. त्यामुळं त्यांना केवळ आश्वासन नकोत तर शीघ्रकृतीद्वारे मदत करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी ई-मेलमध्ये म्हटलं आहे. शेतीबरोबरच घरांचं आणि पाळीव प्राण्यांचंही मोठे नुकसान झाले आहे. याची पंचनाम्यांनंतर रितसर मदत शेतकऱ्यांना दिली जाईलच पण सध्याचा काळ हा आणीबाणीचा असून त्यांना मदतीसाठी वाट पहायला लावू नका. या भागात शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा असंही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं होतं.

"आपला ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी कृषी तसेच मदत व पुनर्वसन विभागाला पाठवण्यात आला आहे," असं उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज ठाकरे यांच्या ई-मेलला देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं राज ठाकरेंचा ई-मेल कृषी विभागाचे एकनाथ दवळे आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या असीम गुप्ता या अधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड करत तो मनसेला सीसी करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT