महाराष्ट्र

अवयवदानातून ठेवल्या मुलाच्या स्मृती जिवंत 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मिरजहून नाझरा (ता. सांगोला) येथे दुचाकीवरून जाताना 9 जूनला झालेल्या अपघातात राजू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर (वय 20) याच्या डोक्‍याला जबर मार लागला होता. त्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी त्याला "ब्रेनडेड' घोषित केले. डॉक्‍टरांच्या प्रबोधनानंतर आई उषा चव्हाण यांनी मुलाच्या अवयदानाचा धाडसी निर्णय घेतला. यशोधरा रुग्णालयात अवयवदानाची शस्त्रक्रिया पार पडली. 

पतीच्या अपघाती मृत्यूनंतर मुलालाही काळाने हिरावून नेल्याने त्या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, अवयवदान केले तर मुलारूपाने इतरांना जीवनदान मिळेल, या उद्देशाने आई उषा चव्हाण यांनी ज्ञानेश्‍वरचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. राजू चव्हाण हे ट्रॅक्‍टरचालक होते. ज्ञानेश्‍वर त्यांना हातभार लावत होता. त्याचा दुसरा भाऊ दिव्यांग असल्याने कुटुंबाची जबाबदारी ज्ञानेश्‍वरवरच होती. दहावीनंतर शिक्षण सोडून त्याने कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली होती. मात्र, काळाने त्याला अचानकपणे हिरावून नेले. 

पाच जणांना जीवनदान 
ज्ञानेश्‍वरच्या अवयवदानामुळे पाच जणांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. त्याचे एक फुफ्फुस पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाला, दुसरे ग्लोबल रुग्णालयाला, एक मूत्रपिंड व स्वादुपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आणि दुसरे मूत्रपिंड यशोधरा रुग्णालयाला दिले आहे. दृष्टिपटल सर्वोपचार रुग्णालयास दान केले आहे. ज्ञानेश्‍वरचा चुलत भाऊ दत्तात्रेय चव्हाण याने वृत्तपत्रातील बातमी वाचून त्याच्या अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि उषा चव्हाण यांनी त्याला होकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT