चित्रा वाघ टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

'त्या' प्रकरणावरून चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल

चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

सकाळ डिजिटल टीम

साकीनाका घटनेनंतर महिलांवरच्या अत्याचाराबाबत विशेष अधिवेशनाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली होती. त्यासाठी राज्यपालांनी (Governor) मुख्यमंत्र्यांना (CM) पत्र पाठविले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या पत्रावर उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या उत्तराचा चित्रा वाघ आणि भाजप महिला आमदारांनी मंत्रालयाच्या समोर पत्र जाळून निषेध केला. या प्रकरणाच्या पाच महिन्यानंतर चित्रा वाघ सह अन्य महिला आमदारांना नोटीस आली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यावर चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. चित्रा वाघ म्हणाल्या, “जर खरचं मुंबई पोलीसांमध्ये (Mumbai police) हिंमत असेल तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा ज्यांनी राज्यातील हजारो बलात्कार पिडीतांची थट्टा केली आहे.” त्या समोर म्हणाल्या, “कालचं सर्वज्ञानीनी सुतोवाच केले की राज्यातील एजन्सी कामाला लावु आणि आज आम्हाला नो़टीस आल्या. अशा धमक्यांना, अशा नोटीसांना आम्ही घाबरत नाही. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला सोलुन काढण्याचे काम आम्हीच करणार”

या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र सादर करावयाचे असल्याने त्यांना २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयात (Court) हजर राहण्यास सांगितले आहे. जर हजर राहले नाही तर समन्स किंवा वॉरंट काढण्याचीही ताकीद देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

SCROLL FOR NEXT