Political News google
महाराष्ट्र बातम्या

'विरोधकांच्या मागे तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा..' चित्रा वाघ यांचा आमदार जाधवांना सल्ला

ज्ञान पाजळणाऱ्या आमदार जाधवांना त्यांच्या मतदार संघातील कारभार दिसत नाही का?

सकाळ डिजिटल टीम

ज्ञान पाजळणाऱ्या आमदार जाधवांना त्यांच्या मतदार संघातील कारभार दिसत नाही का?

सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना भाजपाच्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत शिवसेना नेते भास्करराव जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओतून शाळेच्या गणवेशातील लहान मुले दिसत आहेत. हा व्हिडिओ कोकणातील मिर्ले गावातील असून भास्करराव जाधव यांच्या मतदारसंघातील हे गाव असल्यानं चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

चित्रा वाघ काय म्हणतात व्हिडीओत?

लहान मुलं ही मिर्ले गावातील असून मुलांना शाळेत जाण्यासाठीचा झोलाईदेवी-धनगरवाडी रस्ता अजूनही केलेला नाही. पावसाळ्यात या लेकरांना मोठ्या संकटांना समोर जात या परिसरातून प्रवास करावा लागतो. तिथे जंगली श्वापदांची भिती आहे. मात्र या भागात सरपंच, आमदार खासदारापर्यंत शिवसेनेची सत्ता असतानाही वारंवार मागणी करून कोणतीही पावले उचलेली नाहीत. हा रस्ता जिल्हा परिषदेकडून व्हावा असं कागदोपत्री असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मात्र येथील स्थानिक आमदार भास्करराव जाधव मुंबईत सगळ्यांना ज्ञान पाजळत असतात. जाधवांना त्यांच्या मतदार संघातील कारभार दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणतात, जोरदार पाऊस आला की मुलांची शाळा बंद होते. भितीमुळे मुलांना शाळेत पाठवले जात नाही. या भागांत वृद्धांना प्रवास करताना अडचणी येतात हे आमदारांना दिसत नाही का? जिल्हा परिषेदेत तुमची सत्ता आहे. त्यामुळे मुंबईत बसून तोंडाची वाफ विरोधकांच्या मागे घालवण्यापेक्षा हा जोर मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे लावा आणि निधी आणून रस्त्याचे काम मार्गी लावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुकही केले. त्या म्हणाल्या, आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी जाऊन काम करत आहेत. आदिवसी पाड्यांवर जाऊन लोकांना सुविधा उपलब्ध करुन देत आहेत, या सगळ्याचे स्वागत आहे. मात्र या प्रदेशात शिवसेनेची सत्ता असूनही आमदार तुमचे काम करत नाहीत. त्यामुळे तुम्हीचं पुढाकार घेत या चिमुकल्यांना न्याय द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT