chitra Wagh latest news 
महाराष्ट्र बातम्या

भाई आत असल्याने बोलायची जबाबदारी ताईंवर, चित्रा वाघ यांचा रोख कुणावर?

...त्यामुळे खुप काळजी वाटते सन्माननीय ताईंची, चित्रा वाघ यांचा खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

...त्यामुळे खुप काळजी वाटते सन्माननीय ताईंची, चित्रा वाघ यांचा खोचक टोला

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय बदलांना वेग आला आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हे बिचारे मुख्यमंत्री, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते, असं वक्तव्य केलं होत. यावरून आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी सुळेंवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्या म्हणाल्या, सध्या भाई आत असल्याने ताईंवर बोलायची मोठ्ठी जबाबदारी पडलीये. त्यामुळे खुप काळजी वाटते सन्माननीय ताईंची, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे ?

नवीन सरकार गोंधळलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान होतोय आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे बिचारे मुख्यमंत्री, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना प्रॉम्प्टींग करणं, चिठ्ठी देणं अशा कृतीतून मुख्यमंत्र्यांना कमीपणा दाखवायचं काम उपमुख्यमंत्री करत आहेत. कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतःच गोंधळात आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे. ते महाराष्ट्राला न शोभणारं आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खूप काळजी वाटते, असं त्या म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT