photo esakal
महाराष्ट्र बातम्या

'देशपातळीवर महाराष्ट्राची मान खाली गेलीये त्याच दु:ख नाही'

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेलं मत ही कॉंग्रेसच्या भुमिकेविषयी होती.

सकाळ डिजिटल टीम

सध्या पंतप्रधानांच्या लोकसभेतील भाषणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आपोरप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. महाराष्ट्रातील (Maharashtra) मजूर बाकीच्या राज्यांमध्ये गेल्याने कोरोना वाढला असं ते म्हणाले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही पलटवार करत प्रतित्युर दिले आहे. महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टीका त्यांनी केली होती.

दरम्याना, आता भाजपाच्या चित्रा वाघ यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्या म्हणतात, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेलं मत ही कॉंग्रेसच्या भुमिकेविषयी होती. त्यांनी मांडलेलं मत आणि महाराष्ट्राच्या अपमानाचा संबंध काय? अनिल देशमुख वसुलीकांड, अँटीलीया बॉम्ब प्रकरण, महिलांवर होणारे बलात्कार यात महाराष्ट्राची मान देशपातळीवर खाली गेली याचं दु:ख झालेलं दिसलं नाही, असा ओला चिमटा त्यांनी काढला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या प्रतिक्रियेवर भाजपाच्या आशिष शेलार यांनीही टोला लगवाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा अभ्यास कच्चा असून त्यांच्या डोक्यात एक राजकारण आहे. राज्यातले हे निर्दयी सरकार असल्याचा हल्लाबोल शेलारांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

'आईने हातात पैसे दिले अन् म्हणाली ‘इथून निघून जा'; रवी किशन यांच्या आयुष्यातला धक्कादायक किस्सा

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला पाहिजे - आनंद दुबे

SCROLL FOR NEXT