chitra wagh-sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh|शिवीगाळ प्रकरणी संजय राऊतांवर कारवाई करा : चित्रा वाघ

'राज्यात बलात्कारी गुंड उजळमाथ्याने फिरताहेत.'

गणेश पिटेकर

मुंबई : सर्वज्ञानी संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांना शिव्या दिल्या. लाईव्ह पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जनतेसमोर आणि महिलांसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आलीये. जी घराघरात पोहोचली, असे भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या. ट्विटमध्ये वाघ म्हणतात, लोकप्रतिनिधीची वागणूक कशी नसावी याचा नमुना संजय राऊतांनी (Sanjay Raut) घालून दिलाय. सर्व चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण झालेली त्यांची पत्रकार परिषद पुरावा मानून शिवीगाळ केल्या प्रकरणी संजय राऊतजी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केली. राज्याची पोलिस यंत्रणा सरकारच्या दावणीला बांधली गेल्याप्रमाणे काम करतीये. हे महाराष्ट्राचे (Maharashtra) दुर्दैव आहे. जे वाक्य बोललं गेलचं नाही ते शद्ब भाजप नेते आशिष शेलारजींच्या (Ashish Shelar) तोंडी देण्याचा प्रयत्न करत खोटा गुन्हा दाखल केला. (Chitra Wagh Comment On Sanjay Raut)

याचा मी निषेध व्यक्त करते. मागे ही प्रवीण दरेकर यांच्यावर संदर्भ नसतानाही ५०९ चा गुन्हा दाखल केला. राज्यात बलात्कारी गुंड उजळमाथ्याने फिरताहेत. ढळढळीत पुरावे असताना संजय पाठार, मेहबूब शेख यांना अटक नाहीच. मात्र भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचं सत्र सुरु आहे. खोटा गुन्हा दाखल केल्यावर काय भोगावं लागत आणि कुठल्या दिव्यातून जाव लागतं हे स्वतःला आलेल्या व्यक्तीगत अनुभवातून मुंबई पोलिस आयुक्तांना नीट माहितीये. त्यांनी एकदा स्वतःशी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि मग हव तर खुशाल आमच्या नेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी ट्विटच्या माध्यमातून वाघ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT