Chitra Wagh On Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh On Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे विदूषक"; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका

Sandip Kapde

Chitra Wagh On Uddhav Thackeray:  भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे. राज्यात विदूषकाची टोळी फिरत आहे. उद्धव ठाकरे यांना दुसरं काम उरलं नाही त्यामुळे ते मनोरंजन करतात, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, "जी २० जागतीक परिषदेचे नेतृत्व भारत करत असताना दुसरीकडे काहींच्या पोटात दुखत होतं. यामध्ये पहिला नंबर उद्धव ठाकरे यांचा लागतो. उद्धव ठाकरे यांच्या बालिशपणाची आम्हाला किव येत आहे. दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादात स्वत:च्या सडलेल्या आणि पोकळ बुद्धीचा भोपळा बाहेर फोडण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल. त्यांचे विकृत विचार महाराष्ट्राने ऐकले. न घरका न घाटका, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे विदूषकी वागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,"

"विदूषक केवळ निखळ मनोरंजन करतो. पण उद्धव ठाकरेंना तेही जमत नाही. उद्धव ठाकरे एकटे नाहीत तर सध्या विदूषकांची टोळी राज्यात फिरत आहेत. विदूषकांमध्ये पहिला नंबर सर्वज्ञानी संजय राऊत, दुसरा नंबर भास्कर जाधव आणि तिसरे विदूषक उद्धव ठाकरे आहेत. विदुषकांचा काम असतं लोंकाना हसवन हे तिन्ही विदूषक रोज महाराष्ट्राला हसवायचे काम करतात", अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

राम मंदिर हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आज नरेंद्र मोदी ते स्वप्न पूर्ण करत आहेत. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यात बदल झाला. उद्धव ठाकरे आधी हिंदू विरोधी होते. आता तर ते श्रीरामांच्या विरोधात गेले आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. (Latest Marathi News)

जळगाव येथीळ सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली होती. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Dengue Cases : सावधान ! मुंबईत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणियाचा धोका दुप्पट वाढला; ४,५०० हून अधिक रुग्णांची नोंद

Khandesh Kanubai Ranubai Festival: रोट, फुलोरा आणि ओटी... असा असतो खानदेशातील कानुबाई-राणूबाई उत्सव; श्रावणातील अनोखी परंपरा

Psychological Tricks: रात्री विचारांचा गोंधळ? ‘या’ सायकोलॉजिकल ट्रिक्स देतील शांत झोप

Russia-China Drill : जपानच्या समुद्रात चीन-रशियाचा नौदल सराव; अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान

Work Pressure: 500 हून अधिक कर्मचाऱ्यांनी संपवलं जीवन; 50 तासांपेक्षा जास्त काम... कंपन्यांचा त्रास वाढला

SCROLL FOR NEXT