Narendra Modi And Chitra Wagh esakal
महाराष्ट्र बातम्या

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 'नया भारत' युग सुरु : चित्रा वाघ

देशातील नेहरु युग संपून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 'नया भारत' युग सुरु झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबावर ट्विट करुन टीका केली आहे. त्या म्हणतात, तुमचे भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक असल्याचे केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना परखडपणे सुनावले. या देशातील नेहरु युग संपून नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली 'नया भारत' युग सुरु झाले आहे. हे काँग्रेस आणि गांधी घराण्याने वेळीच लक्षात घ्यावे, या शब्दांमध्ये चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. येथील केंब्रिज विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. (Chitra Wagh Says, Under Narendra Modi Leadership Naya Bharat Era Starts)

विद्यापीठात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण सुरु असताना मध्येच भारतीय अधिकाऱ्याने सुनावले. सिद्धार्थ वर्मा असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक असल्याचा आरोप अधिकाऱ्याने गांधी यांच्यावर केला. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ वर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंब्रिज विद्यापीठाच्या काॅर्पस क्रिस्ती महाविद्यालयात 'इंडिया अॅट ७५' या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हिंदू राष्ट्रवाद, गांधी कुटुंबाची भूमिका आणि काँग्रेस पक्ष यासह इतर मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले.

सिद्धार्थ वर्मा कोण ?

सिद्धार्थ वर्मा यांनी कार्यक्रमात राहुल गांधींना सुनावले. वर्मा हे भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. ते भारतीय रेल्वे ट्राफिक सेवा अधिकारी असून केंब्रिज विद्यापीठात काॅमनवेल्थ स्काॅलर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT