Morde Chocolate Sakal
महाराष्ट्र बातम्या

Chocolate Day च्या दिवशी धुमाकूळ घालणारे मोरडे चॉकलेट पुण्याच्या एका छोट्या गावात सुरू झालेलं

आजच्या दिवशी प्रत्येक प्रेमवीर आपल्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देत असतो.

दत्ता लवांडे

सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू आहे. हा आठवडा म्हणजे प्रेमवीरांचा आठवडा असतो. पहिल्या दिवशी गुलाब देऊन, प्रपोज करून, प्रॉमिस करून किस करून शेवटी व्हॅलेंटाईन साजरा करून हा आठवडा संपतो. तर आज चॉकलेट डे आहे. आजच्या दिवशी प्रत्येक प्रेमवीर आपल्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देत असतात.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

महाराष्ट्रात आणि देशात या दिवशी मोरडे या टॉकलेट ब्रँडचा मोठ्या प्रमाणावर खप होतो. त्याचबरोबर प्रेमवीरही आपल्या आवडत्या व्यक्तीला द्यायला या चॉकलेटचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की चॉकलेट डेच्या दिवशी धुमाकूळ घालणारे मोरडे चॉकलेट पुण्याच्या एका छोट्या गावात सुरू झालेलं होतं. याच मोरडे चॉकलेटचा इतिहास आपण यातून जाणून घेणार आहोत.

31 डिसेंबर 1983. या दिवशी श्री. चंद्रकांत मोर्डे यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कोको उत्पादन बाजारपेठेत इतर सर्वांना मागे टाकणाऱ्या कंपनीचा पाया रोवला. चंद्रकांत मोर्डे यांना फूड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता. त्यांनी आपल्या घरातील व्यक्तीपासून कामाला सुरूवात केली. त्यांची गुंतवणूकही तोडकीच होती. सध्या त्यांनी अनेक प्रकारच्या चॉकलेटची निर्मिती या कारखान्यात केली आहे. सुरूवात 3 उत्पादनापासून सुरू केलेल्या कारखान्यात आजच्या घडली 150 प्रकारचे चॉकलेट तयार होतात.

ज्या व्यवसायांना चॉकलेटची गरज आहे त्यांच्यासाठी मॉर्डे हा आजचा ब्रँड आहे. ते चॉकलेट, फिलिंग्स, क्रीम्स, कंपाऊंड्स, कोको उत्पादने, सजावट, चॉकोपेस्ट आणि अगदी चोकोडिप्स सुद्धा उत्पादित करतात. त्याचबरोबर HoReCa, बेकरी, आईस्क्रीम, QSR, होम बेकिंग आणि कन्फेक्शनरी क्षेत्रात सुद्धा यांचे उत्पादने असतात.

येथील प्रत्येक उत्पादने विशेष काळजी घेऊन तयार केले जातात. या ब्रँडच्या वाढीसाठी मोरडे ग्रुप मंचर येथील स्थानिक शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे श्रेय असल्याचं सांगतात. मागच्या जवळपास ४० वर्षे हा ब्रँड आपल्या महाराष्ट्राची शान वाढवत आहे. तर चॉकलेट डेच्या दिवशी याच ब्रँडचा वापर केला जातो हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT