Sachin-Sawant 
महाराष्ट्र बातम्या

सिडको गैरव्यवहार हे हिमनगाचे टोक - सचिन सावंत

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सिडकोच्या कामात प्रचंड अनागोंदी व अनियमितता असून, मोठा भ्रष्टाचार झाल्याचे महालेखापालांच्या (कॅग) आजच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. फडणवीस सरकारने टेंडरच्या माध्यमातून जनतेचा पैसा लुबाडला आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारचा बुरखा या अहवालामुळे टराटरा फाडला आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.

सावंत म्हणाले की, सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतर अशा २००० कोटी रुपयांच्या कामांमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. सिडकोचे काम थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली होत असताना एवढा मोठा गैरव्यवहार झालाच कसा. या गैरव्यवहारातील मास्टर माइंड कोण आहे, तेही आता समोर आले पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी या वेळी केली.

कंत्राटदारच अध्यक्ष कसा? 
कामाचा अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला ८९० कोटींची कामे दिली गेली. सिडकोचा कंत्राटदारच सिडकोचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो, हे आम्ही सरकारला विचारले होते. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कामाच्या निविदा राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती न देता काढण्यात आल्या. तर ४३० कोटी रुपयांच्या दहा कामांमध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. हे गंभीर असून सिडकोमधील हा गैरव्यवहार हिमनगाचे एक टोक आहे, असा आरोप सांवत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT