उद्धव ठाकरे-रोहित शेट्टी  
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्याचा मुहूर्त ठरला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.

रश्मी पुराणिक

मुंबई: कोरोनामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याअंतर्गत सिनेमागृह, थिएटर्स बंद होती. आता सिनेमागृह, थिएटर्स सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये थिएटर्स, सिनेमागृह २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

मनोरंजन सृष्टीतून बऱ्याचकाळापासून थिएटर्स सुरु करण्याची मागणी होत होती. कलाकारांप्रमाणेच पडद्यामागे काम करणाऱ्या लाखो लोकांचे रोजगार चित्रपट, नाटकांवर अवलंबून आहेत. चित्रपटसृष्टीसाठी मुंबईत सर्वात जास्त महत्त्वाची आहे. कारण मुंबईतून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो. राज्य सरकारच्या तिजोरीतही मनोरंजन कराच्या रुपाने भर पडत असते.

अनेक बडे सिनेमे प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. बॉलिवूडमधुन रोहित शेट्टी हे मोठं नाव आहे. ते आजच्या बैठकीला उपस्थित होते. तिसऱ्या लाटेचा धोका आता कमी झालाय. अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. चित्रपटगृह, नाटयगृहांमुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या रुपाने चांगली रक्कम जमा होऊ शकते. राज्यातील अनेक ज्येष्ठ कलाकार त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटाबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. तसंच थिएटर चालक, मालक आणि त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांची मागणीही विचारात घेतली गेली नाही. यामुळे सध्या वाद सुरु झाला होता. देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन थिएटर सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही थिएटर्स सुरु कऱण्याची मागणी केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT