anandrao adsul e sakal
महाराष्ट्र बातम्या

अडसूळ यांच्यावर आरोप असलेला सीटी बँक घोटाळा नेमका आहे तरी काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (shivsena former mp anandrao adsul) यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सीटी बँक घोटाळ्याप्रकरणी (city bank scam) ही चौकशी करण्यात येत आहे. ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या घरी असतानाच त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. पण, हा सीटी बँक घोटाळा नेमका काय आहे? ते पाहुयात.

आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी या मतदार संघावर ताबा मिळविला. त्यानंतर अडसूळ खासदार नवनीत राणांविरोधात न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने अडसूळ यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचा आरोप अडसूळ पिता-पुत्रांचा आहे.

नेमका काय आहे सीटी बँक घोटाळा?

अडसूळ हे सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. तसेच या बँकेच्या संचालक मंडळावर अडसूळांचे नातेवाईक होते. या बँकेत पेंशनधारक, तसेच ९९ टक्के मराठी लोकांचे खाते आहेत. या बँकेतून बिल्डरांना अवैधरित्या कर्ज वाटप करण्यात आले. त्यामधून अडसूळ यांनी कमिशन घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीएमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे ही बँक गेल्या २ वर्षांपासून बुडीत आहे.

आमदार रवी राणा यांनी स्वतः ईडीकडे याप्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने अडसूळ यांना पहिलं समन्स बजाविलं होतं. त्यावेळी आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. आज परत एकदा ईडीने आनंदराव अडसूळ यांना समन्स बजाविले आहे. त्यानुसार त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आपण चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही, असे अडसूळ यांनी ईडीला सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

Gulshan Kumar यांच्या हत्येचं रहस्य २८ वर्षांनंतर उघड, मृत्यूच्या दीड वर्षाआधीच रचला होता कट, तपास अधिकाऱ्यांनी सांगितली आतली गोष्ट

SCROLL FOR NEXT