Shivsena Case  
महाराष्ट्र बातम्या

निकाल आधीचं लागला होता? CJI चंद्रचूड यांचे तेव्हाचे तीन वाक्य ज्यातून लक्षात येईल उद्धव ठाकरे कुठं चुकले

Sandip Kapde

Shivsena Case : सर्वोच्च न्यायालयाने नबाम रेबिया सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

भारत गोगावाले (शिंदे गटाचे नेते) व्हीआयपी म्हणून नेमणूक करणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्यपालांनी भूमिका देखील बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

कोर्टाने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना दिलासा मिळू शकला असता. पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करता आले असते.

मात्र राजीनामा देणं हे उद्धव ठाकरे यांनी चांगल भोवलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा महत्वाचा मुद्दा ठरला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला फटकारले. तसेच त्यांचे निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहे.

शिंदे गटाचा व्हिप बेकायदेशीर असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांच्या व्हिप विधानसभा अध्यक्ष गृहीत धरतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shivsena Case verdict

दरम्यान उद्धव ठाकरे - शिंदे यांच्या याचिंकावर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्वाचे वक्तव्य केले होते. ज्यामुळे उद्धव ठाकरे कुठं चुकले हे लक्षात येईल.

"जर आपण अविश्वास ठरावाला समोरे गेले असता आणि पराभूत झाला असता. तर ३९ लोक तुमच्या विरोधात गेले आहेत. हे स्पष्ट झालं असतं. या ३९ लोकांमुळं तुम्ही पराभूत झाला असता तर ते अपात्र ठरले असते. सहाजिकच तुम्ही (उद्धव ठाकरे) जिंकला असता, असे डिवाय चंद्रचूड यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT