Chhatrapati Sambhajinagar 
महाराष्ट्र बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, राम मंदिराबाहेर गाड्यांची जाळपोळ

देशभरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशभरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. किऱ्हाडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली.( clash broke out between two groups in Chhatrapati Sambhajinagar's Kiradpura area)

किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.

रस्त्यावर मंदिराशेजारी उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन सगळ्यांना आवाहन केले.

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

इम्तियाज जलील अतुल सावे प्रदीप जयस्वाल आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वत: मंदिरात कोणतीही हानी नाही अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT