Thackeray vs Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde : कणकवलीत ठाकरे-शिंदे गटात राडा, पोलीस बंदोबस्त तैनात!

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग : शिंदे आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष आता मैदानात देखील पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील बंडानंतर सेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत असतात.

दरम्यान हे दोन गट आता मैदानावर देखील आमने-सामने येत आहे. कणकवलीत ठाकरे-शिंदे गटात मोठा राडा झाला. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

सिंधुदुर्गच्या कणकवलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला आहे. कणकवलीतील कनेडी गावातील पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे मोठा तनाव निर्माण झाला होता. दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. 

यापूर्वी मुंबईतील गणेश विसर्जनादरम्यान देखील ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये राडा झाला होता. या राड्याच्या वेळी गोळीबार देखील झाला होता. ही गोळी एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातून सुटल्याचं बॅलेस्टिक अहवालातून समोर आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT