11th Admission  Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! अकरावीची गुणवत्ता यादी लांबली, जात प्रवर्गनिहाय कट ऑफ दिसेना; ४८ तासानंतरही ‘आयटी’चे काम सुरूच, आता कधी जाहीर होणार यादी, वाचा...

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन राबविली जात आहे, पण पहिल्याच गुणवत्ता यादीला तांत्रिक अडथळा आला आहे. बुधवारी (ता. २५) पहाटे तीन आणि आता रात्री उशिरापर्यंत काम करूनही माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कर्मचाऱ्यांना तो अडथळा नेमका कोठे आहे हेच सापडलेले नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन राबविली जात आहे, पण पहिल्याच गुणवत्ता यादीला तांत्रिक अडथळा आला आहे. बुधवारी (ता. २५) पहाटे तीन आणि आता रात्री उशिरापर्यंत काम करूनही माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कर्मचाऱ्यांना तो अडथळा नेमका कोठे आहे हेच सापडलेले नाही. त्यामुळे पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्यास आणखी चार दिवस लागू शकतात, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ३० जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर १ ते ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. ९ जुलैला प्रवेशानंतरही रिक्त राहिलेल्या जागा प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर पुढील गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची प्रतीक्षा आहे. २६ तारखेला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हेलपाटे घातले, पण यादी प्रसिद्ध झालीच नाही. सध्या शाखानिहाय व गुणांच्या टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पण, जात संवर्ग आणि समांतर आरक्षणनिहाय साडेनऊ हजार महाविद्यालयांमधील कोणत्या शाखेचा कट ऑफ किती? हे त्या संकेतस्थळावर दिसत नाही. त्यामुळे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करता आलेली नाही.

अजूनही तो अडथळा नेमका कोठे दडलाय, याचा शोध आयटीच्या टिमला सापडलेला नाही. त्यासाठी आता पहिल्यांदा एखाद्या शाखेची यादी प्रसिद्ध करता येईल का?, हा मार्ग काढला जात आहे. ३० जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर १ ते ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. ९ जुलैला प्रवेशानंतरही रिक्त राहिलेल्या जागा प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर पुढील गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

एरर निघेल आणि गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध होईल

इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तांत्रिक अडचणीमुळे आज (ता. २६) प्रसिद्ध होऊ शकली नाही. जात संवर्ग, समांतर आरक्षणनिहाय कट ऑफ जाहीर करण्यास अडचणी येत आहेत. त्यावर माहिती तंत्रज्ञान (आयटी) व शिक्षण विभागाचे कर्मचारी, अधिकारी त्यावर काम करीत आहेत. अजूनही तो एरर (अडथळा) सापडलेला नाही.

- महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे

अकरावीचे वर्ग जुलैअखेर सुरू होणार

अकरावीची प्रवेश प्रक्रिया २५ दिवसांत उरकून १८ जुलैपासून सर्व महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन होते. पण, आता पहिल्याच गुणवत्ता यादीसाठी तांत्रिक अडचण आल्याने गुणवत्ता याद्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले असून त्यामुळे प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होण्यास जुलैअखेर वाट पहावी लागणार आहे. ३० जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर १ ते ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. ९ जुलैला प्रवेशानंतरही रिक्त राहिलेल्या जागा प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर पुढील गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT