Eknath Shinde Latest News Eknath Shinde Latest News
महाराष्ट्र बातम्या

"त्यांची अन् माझी घनिष्ठ मैत्री"; अजित पवारांच्या 'त्या' टीकेला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील विविध विकास आराखड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन चर्चा केली आहे. दरम्यान केंद्रात झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी १८ हजार कोटींच्या विकास कामाचे प्रस्ताव केंद्राला पाठवले आहेत. त्यावेळी झालेल्या चर्चेविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. शिवसेना भाजप सरकार चांगलं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अजित पवारांचे आणि आमचे जुने संबंध असल्याचं सांगितलं आहे.

"काही दिवसांपूर्वी अजित पवार मला भेटले होते त्यावेळी अजित पवारांनी आमच्या कामाचं कौतुक केलं असून त्यांचे आणि आमच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहेत. फ्रेंडशिप डेच्या सर्वांनाच शुभेच्छा असं म्हणत राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अजित दादांना लवकरच माहिती पडेल." असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

दरम्यान, निती आयोगाच्या बैठकीत कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी कामं केलं जाणार असून जास्तीत जास्त जमीनी सिंचनाखाली कशा येतील यावर चर्चा केली गेली. तसेच तेलाच्या उत्पन्नावर भर देणार असल्यामुळे कृषी क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत असं त्यांनी सांगितलं. शिक्षण विभागातही अमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याची चर्चा या बैठकीत झाली. या अशा निर्णयामुळे देशात आणि राज्यात अनेक अमूलाग्र बदल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून विरोधीपक्षनेते अजित पवार आणि आमची मैत्री घनिष्ठ आहे. मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देत अजित पवारांना लवकरच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख कळेल असा टोलाही त्यांनी लावला. दरम्यान, अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारावर काल बोलताना सरकारवर निशाणा साधला होता.

आम्हाला काही दिवस वेळ द्या, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर येत्या निवडणुकात आमच्या भाजप शिवसेना युती सरकारचं मिशन ४८ आहेच असंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT