cm eknath shinde announces lumpy disease relief as per ndrf criteria in state  
महाराष्ट्र बातम्या

जनावरांच्या लम्पी आजारावर NDRFच्या निकषानुसार मदत; CM शिंदेंची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यादरम्यान त्यांनी जनावरांच्या लम्पी आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार लम्पी आजारावर मदत करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पैठण येथे आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली यावेळी बोलताना त्यामंनी शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घेषणा केल्या

जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी आजारावर एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या भाषणादरम्यान म्हणाले की, आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार परतफेडीचा निर्णय घेतला आहे. सतत पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यांना मदत करण्यासाठीचा जीआर काढण्याचा निर्णय, गोगलगाईमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत निर्णय घेतयाल. तीन हेक्टर एवजी तीन हेक्टर शेतीला नुकसान भरपाई दिली पाहिजे याचा निर्णय घेतला. तसेच एनडीआरएफपेक्षा दुप्पट मदत देणयाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रूपये मिळत होते, तेथे आता 15 हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला. जनावरांचा आजार लम्पी यासंदर्भात देखील एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय़ कॅबिनेट बैठकीत घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत यासाठी हे सरकार कठिबध्द आहे, असे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले. पैठण येथे १०० खाटांचे रुग्णलयाची मागणी देखील सरकार मान्य करेल असेही सांगितले.

दरम्यान राज्यात पुणे, जळगाव, नगर, अकोला, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या प्रादुर्भावामुळे पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. आता सरकरने देखील आजाराबाबत गांभिर्य दाखवत मदतीची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT