Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

औरंगाबादचं नवं नाव छत्रपती संभाजीनगर; CM शिंदेंची मोठी घोषणा

उस्मानाबादचं नाव धाराशीव तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मागच्या सरकारचे काही निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Cm Eknath Shinde DCM Devendra Fadnavis Cabinet Meeting)

मागच्या सरकारने घाईगडबडीत, अल्पमतात असताना काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव असं करण्यात आलं आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.

याशिवाय मुंबई आणि उपनगर भागामध्ये MMRDA त्या विविध प्रकल्पांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींसाठी शासनाने हमी देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Result : मुंबई महापालिकेच्या १६१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप महायुतीची सत्ता, विजयाची 'ही' आहेत ५ कारणे

Latest Marathi News Live Update : भाजपचा विजयरथ सुसाट! मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांमध्ये कमळ स्वबळावर फुलले

Political Violence Shivaji Peth Kolhapur : शिवाजी पेठेत बोंद्रे-खराडे गटात तुफान राडा, हवेत गोळीबार?; माजी महिला महापौरांसह पाच जखमी

Pune : शिंदेंनी ११९ उमेदवार दिले पण एकही जिंकला नाही, मनसेचं इंजिनही यार्डातच

Sai Thopate : सई थोपटे पुण्यातील सर्वात तरुण नगरसेविका, २२ व्या वर्षी महापालिका निवडणुकीत विजय मिळवत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT