EKnath Shinde with MLAs Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : 'चलो अयोध्या'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामलल्लाच्या दर्शनाला जाणार

मुख्यमंत्र्यांसह बाळासाहेबांची शिवसेना गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातले नेते आणि त्यांचे अयोध्या दौरे हा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. राज्यातलं सत्तानाट्य आणि एकनाथ शिंदेंचं बंड यानंतर हा विषय मागे पडला असला तरी आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. तोही एकनाथ शिंदेंच्याच मुळे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीनंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये हा दौरा होणार आहे. तिथे जाऊन शिंदे रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी शिंदे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे अनेक आमदारही अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेतल्या बंडापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी एकनाथ शिंदे अयोध्येला गेले होते. पण आता बंडानंतर ते स्वतः मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जात आहेत. दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातले मंत्री आणि भाजपा गटाचे मंत्री शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT