Eknath Shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मोठी घोषणा; बाळासाहेबांच्या नावे सुरू होणार दवाखाने

या दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Balasaheb Thackeray Apala Dawakhana : दसरा मेळाव्यासाठी अवघ्या दोन दिवस राहिलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शिंदे हे खरोखरीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात 700 दवाखाने सुरू करण्यात येणार असून, ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या नावाने हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दसरा मेळाव्यापूर्वीच शिंदे यांनी ही घोषणा केल्याने त्याला अधिक महत्त्व आले आहे.

ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सुमारे 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून, मुंबईत 227 ठिकाणी हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 50 दवाखाने 2 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याशिवाय राज्यात कॅथलॅबदेखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT