Eknath Shinde Bill Clinton Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde : बिल क्लिंटन म्हणतो, एकनाथ शिंदे किती काम करतो, झोपतो कधी खातो कधी

आपल्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतलीय, असा दावाही यापूर्वी एकनाथ शिंदेंनी केला होता.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि आपल्या सोबत शिवसेनेचे ४० आमदार घेऊन वेगळा गट आणि सरकार स्थापन केलं. या बंडाची ३३ देशांची दखल घेतली, या दाव्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी एक नवा दावा केला आहे.

नागपुरातल्या महासत्तांतर या विशेष कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "माझ्याकडे महिन्याभरापूर्वी एक माणूस आला होता. तो बिल क्लिंटनकडे राहतो. तो भारतीय आहे, पण तो त्यांच्याकडे राहतो. त्याचा एक नातेवाईक तिकडे गेला होता. त्याला बिल क्लिंटन म्हणाला, हू इज एकनाथ शिंदे, कोण आहे, केवढं काम करतो, कधी खातो, कधी झोपतो."

हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "आजही पत्रकार मित्र उत्सुकतेने विचारतात, पण सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत. काही लोकांना वाटलं आम्ही संपलो, पण तसं नाहीये. आम्ही मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतला नाही. मी कधीही सूड भावनेनं काम करत नाही. मी मदत केली की सांगत नाही. मी कोत्या वृत्तीचा नाही, कोत्या मानसिकतेचा नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Victim Father Statement: “माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत येऊ नका” नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी राजकीय नेत्यांना फटकारलं

Shrirampur Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या मुलाकडून वडिलांचा खून; श्रीरामपुरात धक्कादायक घटना, घरगुती कलहाचा थरारक शेवट!

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पूर्ण गावानेच घेतला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नितीन गडकरींची घेणार भेट

Education Success Story: शेतमजूर कुटुंबातील मयुरी लावंडची झेप; बारावीत ८६% गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

Delhi Judge Endlife : बाबा, मी आता जगू शकत नाही... ३० वर्षीय न्यायाधीशाने गळफास घेऊन संपवले जीवन, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT