Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: 'मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य टाळा', मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांना तंबी

‘‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये सुरु असलेल्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

‘‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये सुरु असलेल्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

‘‘निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणीही यावर वक्तव्य करू नये,’’ अशा सूचना शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या. विशेषतः मंत्री छगन भुजबळ आणि शंभुराज देसाई यांनी वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची मराठा आरक्षण, राज्यातील परिस्थिती आणि मंत्र्यांची याबाबत सुरु असलेली वादग्रस्त विधाने याबाबत चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवर मंत्री शंभुराज देसाई यांनी या बैठकीतही आक्षेप घेतला. मात्र, अन्य मंत्र्यांच्या भूमिकेमुळे सरकार पडेल, या भुजबळांच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर छगन भुजबळ यांनी बीडमधील गंभीर परिस्थिती पाहिल्यानंतर रागातून बोलल्याचा खुलासा केला.

‘‘महायुतीत विसंवाद असल्याचे चित्र जनमानसात जाऊ नये, यासाठी मंत्र्यांनी आपापसांत समन्वय ठेवावा,’’ असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. ‘‘दोन समाजांत जातीय तेढ निर्माण होणार नाही, याचे भान ठेऊन मंत्र्यांनी जबाबदारीने बोलावे. आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्या,’’ अशी समज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली.

दिवाळीत वातावरण बिघडू नये

राज्याची पुरोगामी परंपरा आहे, जातीधर्मामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. महायुतीच्या बैठकीनंतरही मतभेद बाहेर येत असतील तर ते चुकीचे आहे. दिवाळीमध्ये वातावरण बिघडू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIP Darshan Ban: यंदाही आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आचारसंहितेतून आषाढी कामांना वगळण्यासाठी प्रस्ताव

Marathi Live News update: ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना डिझेल टंचाईचा फटका

कोल्हापूर हद्दवाढीचा आराखडा, रस्त्यांची रुंदी घटली; घरकुलासाठी ५ एकर, वगळलेल्या भागाचा नकाशा प्रसिद्ध

Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडीला दिलासा! ‘कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरणाला गती; ८४ मिळकती ताब्यात, वाहतूक कोंडीवर तोडगा

६ पराभवांनंतर पंजाबचं नशीब मुंबईच्या हातात? लखनौला हरवूनही श्रेयस अय्यरची सेना प्ले-ऑफमधून बाहेर पडू शकते, समजून घ्या 'ते' गणित!

SCROLL FOR NEXT