Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : 'कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी नेहमीचं 'ते' वाक्य का टाळलं?', मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Loksabha Election 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन इंडिया अलायन्सच्या रविवारच्या सभेवर जोरदार टीकास्र सोडलं. यासह त्यांनी उद्धव ठाकरेंवर सणसणीत टीका केली. सन्मानजनक जागावाटप लवकरच होईल, असंही शिंदेनी सांगितलं.

संतोष कानडे

Loksabha Election 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन इंडिया अलायन्सच्या रविवारच्या सभेवर जोरदार टीकास्र सोडलं. यासह त्यांनी उद्धव ठाकरेंवर सणसणीत टीका केली. सन्मानजनक जागावाटप लवकरच होईल, असंही शिंदेनी सांगितलं.

एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने अनेक योजना हाती घेतल्याने शेतकरी, कामगार, युवक, उद्योजक, महिला यांच्या आयुष्यात बदल झाले. अनेक मोठे प्रोजेक्ट सरकारने पूर्ण केले आहेत. गेम चेंजर प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने सामान्य जनता समाधानी आहे. मागच्या दीड ते पावणेदोन वर्षात अनेक निर्णय वेगाने घेतले आहेत. शिवाय आणखी नवीन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

''पाच लाख कोटींची परदेशी गुंतवणूक राज्यामध्ये आलेली आहे. केंद्राचीही मोठी मदत राज्याला झाली आहे. याचा सर्व फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होईल. महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो की, अत्यंत कमी कालावधीत त्यांनी आमच्या सरकारवर विश्वास ठेवला. आजवरच्या ५५ मंत्रिमंडळ बैठकीतून ५०० लोकहिताचे निर्णय घेतले.''

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कालचा दिवस खरंच काळा दिवस होता. काल उद्धव ठाकरे यांनी एक वाक्य टाळलं. 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो' हे वाक्य आता त्यांनी का वगळलं? आपापल्या राज्यांमधून तडीपार झालेल्या लोकांच्या सोबत उद्धव ठाकरे बसले होते. सगळ्यांचे चेहरे कसे होते, हे सांगायची गरज नाही.

''ज्या मोदीजींना जनतेने एवढ्या उंचीवर नेवून ठेवलं आहे, त्यांच्याबाबत हेच २०१४ ला आणि २०१९ ला काय बोलत होते? आणि आता काय बोलत आहेत? त्यामुळे जनता उबाठा गटाला धडा शिकवेल. राष्ट्रीय नेत्याच्या ठाण्यातील सभेला पाचशेसुद्धा लोक नव्हते.'' असं शिंदे म्हणाले.

''इंडिया अलायन्सकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही''

जिथं बाळासाहेब शिवतीर्थावरुन देशाला मार्गदर्शन करायचे, तिथंच ह्यांनी अशी सभा घेऊन लायकी दाखवून दिली आहे. त्यांच्या अलायन्सकडे सध्या पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, धड विरोधी पक्षनेता त्यांच्याकडे नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एनडीएचा विजय होईल, यात शंका नाही.

''शिवतारे मला भेटले त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य आहे... ते सध्या उपचार घेत आहेत. महायुतीमध्ये सगळे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, यात शंका नाही.'' असं म्हणत शिंदेंनी शिवतारे-पवार वादावर भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT