Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : अजित पवार मुख्यमंत्री होणार? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट

रोहित कणसे

Ajit Pawar News : राज्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब दिल्लीत दाखल झाले आहेत. खासदार शिंदे यांच्या मिनाबाग येथील निवासस्थानी ते मुक्कामी थांबले आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसेच भाजपच्या इतरही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री अचानक मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. दरम्यान हा नियोजित दौरा नसून मुख्यमंत्री शिंदे वैयक्तिक कामासाठी दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तरी दिल्लीत चे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच १८ जुलै रोजी एकनाथ शिंदे हे एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले होते. ते परत दिल्लीत गेल्याने उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराला वेग येणार का याबद्दल चर्चाना वेग आला आहे.

अजित पवार राष्ट्रवादीच्या ८ इतर आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाल्यानंतर लवकरच उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले जात होते. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यताक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात याबद्दल काही चर्चा होते काय ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार?

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार लवकरच मुखमंत्री होतील असं विधान काल केलं. यानंतर आता राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यांने देखील अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. आज (दि. २२ जुलै) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी एक व्हिडिओ ट्विट केला असून यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला त्यांनी 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असे कॅप्शन दिले. यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात भुकंप पाहायला मिळणार का अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT