Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा मुक्काम आता फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात

सात वर्षांनंतर आज (शनिवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

सात वर्षांनंतर आज (शनिवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आली आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या राहण्याची सोय शासकीय निवासस्थानी न करता एका संभाजीनगरमधील आलिशान रामा हॉटेलमध्ये करण्यात आली होती. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे हे 32 हजार रुपये इतके आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती.

अनेक वृत्तवाहिन्यांनी यासंबधीचे वृत्तही प्रकाशित केले होते. तसेच विरोधकांनीही राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुक्काम फाईव स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहामध्ये हलवल्याची माहिती समोर आली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम करणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलं आहे.

दरम्यान या बैठकीमध्ये मराठवाड्यातील दुष्काळावरती काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन संभाजीनगरमध्ये उपस्थित आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमधील सूट बुक करण्यात आलेला होता. हॉटेल रामामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे हे 32 हजार रुपये इतके आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT