Ashadhi Wari 2023 
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारची मोठी घोषणा

वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली

धनश्री ओतारी

आषाढी वारी सुरु आहे. दरम्यान, वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.(Latest Marathi News)

या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल. (Latest Marathi News)

'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेत ‘या’ बाबींचा समावेश

  1. एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.(Latest Marathi News)

  2. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.

  3. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील.

  4. वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT