Eknath Shinde Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : 'आमच्यातला छोटा वाद मिटला', कल्याणमधील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला होता. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनामा देण्याची भाषा केली होती. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये फूट पडतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

कल्याणमध्ये नेमकं काय झालं?

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजप ठरवणार असल्याचं विधान एका भाजपच्या महिलेनं केलं होतं. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, मी सोशल मीडियावर स्टेटमेंट्स ऐकली आहेत. मला वाटतं वरिष्ठ पातळीवर उमेदवार कोण असेल हे ठरेल. जो योग्य असेल त्याला उमेदवारी देतील.

'मला कुठलाही स्वार्थ नाही, मला कोणी सांगितलं की कल्याण लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा द्या तर मी देईन आणि पक्षाचं आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. दुसरा कोणताही उमेदवार इथं असेल तर त्याला निवडून देण्यासाठी मी काम करेन. आमचा उद्देश एकच आहे २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, यात कुठलाही स्वार्थ नाही' असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं.

मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण

भाजप-शिवसेना वादावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सेना-भाजपमधला छोटा वाद मिटला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही.

कल्याणमध्ये भाजप पदाधिकारी नंदू जोशींवर गुन्हा दाखल केल्याने वाद उफाळला होता. त्यावर एकनाथ शिंदेंनी पडदा टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT