CM Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री इर्शाळवाडीत! लोकांच्या रोजगाराचा सोडवणार प्रश्न, व्यवसायासाठी सरकार करणार आर्थिक मदत

कंटेनर्समध्ये त्यांना पायाभूत सुविधा मिळत आहेत की नाही याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी शिंदेंनी शिक्षण घेणारे तरुण आणि अनाथ झालेल्या मुलांबद्दलही काळजी व्यक्त केली.

सकाळ डिजिटल टीम

CM Shinde In Irshalwadi: इर्शाळवाडीमधील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसण कंटेनरमध्ये करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या गावाला भेट दिली. या कंटेनर्समध्ये त्यांना पायाभूत सुविधा मिळत आहेत की नाही याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी शिंदेंनी शिक्षण घेणारे तरुण आणि अनाथ झालेल्या मुलांबद्दलही काळजी व्यक्त केली.

शिक्षण घेणाऱ्या मुलांची त्याच ठिकाणी सोय करण्यात येणार असून जे मुलं या घटनेत अनाथ झाले, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आश्वासन देण्यात आले.

इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळल्याने अनेक लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावर सरकारकडूनही तातडीने मदत करण्यात आली होती. मुख्यनमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्याचा आढावाही त्यावेळी घेतला होता. आता या लोकांचं कायमस्वरुपी पुनर्वसण कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.(Latest Marathi News)

यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सहा महिन्याच्या आत पक्के घर मिळतील, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी गावातील लोकांचा रोगजागाराचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करत असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "रोजगाराचा विषय कशा माध्यमातून आपल्याला मार्गी लावता येईल, तशा तातडीने सुचना दिल्या आहे. काही लोकांना नोकरीच्या ऐवजी व्यवसाय, व्यवसायासाठी जागा आणि आर्थिक मदत याठिकाणी करु. एका व्यवसायातील किती लोक सामावले जाऊ शकतात, याचा आढावा घेऊन लवकर निर्णय घेऊ."

यापुढे मुख्यमंत्री म्हणाले की, "सर्वांना प्रश्न पडला असणार की घरं कधी मिळणार आम्हाला? अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी बोलवलंय, त्यांना निर्णयही देण्यात आलाय. जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे कायमच्या पुनर्वसणाकडे जास्तीचं लक्ष देऊन सहा महिन्याच्या आत चांगली आणि सोयीची घर देऊ. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT