eknath shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर?

मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचवेळा दिल्ली दौरा केला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी पुन्हा दिल्ली गाठली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 'साम' वृत्तवाहिनीने दिलेल्या एका बातमीनुसार शिंदे यांनी रात्रीत दिल्ली दौरा केला आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी या दोन्ही मुद्द्यांवर नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाला 18 मंत्रिपद देण्यात यावी, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे केली आहे. कोर्टाच्या निकालानंतर लगेचच मंत्रीमंडळ विस्तार करावा लागेल असेही एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना सांगितले असून रात्री साडेतीनच्या सुमारास शिंदे दिल्लीतून मुंबईत परतले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हे पाचव्यांदा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन वीस दिवस झाले आहेत. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातच हा विस्तार होण्याची चर्चा होती, पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर काही कारणांमुळे विस्तार रखडल्याचं बोललं गेलं.

दरम्यान, नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या शपथविधी नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल अशी चर्चा होती. मात्र अजूनही हा विस्तार झाला नसल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी सुरुच आहे. दरम्यान, दिल्लीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अजुनही यावर कोणातही निर्णय झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-India Relations: अमेरिकेला भारताची एवढी भीती का? ''चीनसारखी चूक आम्ही पुन्हा करणार नाही'', ट्रम्प यांच्या मंत्र्याचं मोठं विधान

पंढरपूरच्या चोरट्याने 6 जिल्ह्यातून चोरल्या 9 लाखांच्या दुचाकी; सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चोरट्याला पकडले, 4-5 हजारात उसने पैसे घेऊन द्यायचा दुचाकी

Pachod News : मध्यप्रदेशातील तरुण पोकलेन ऑपरेटरने झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले; रांजणगाव, पोलीस तपास सुरू

Manoj Ramchandra Patil Success Story : पहिल्यांदाच यु.पी.एस.सी.परीक्षेत दुष्काळी जालीहाळचा मनोज पाटील उत्तीर्ण

मानसिक विकलांग महिलेवर अतिप्रसंग, आरोपी सीटीटीव्हीत कैद; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT