eknath shinde on uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

"राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या!"; शिंदेचा ठाकरेंना पुन्हा धक्का

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकारणाचा खेळ अजूनही सुरू आहे. बंड करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना धक्का दिलेल्या एकनाथ शिंदेंनी आणखी धक्के देणं सुरूच ठेवलं आहे. आता ठाकरे सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी मागे घ्यायची मागणी करत शिंदेंनी आणखी एक धक्का दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. मात्र ही यादी रद्द करण्याची मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यात आता सत्तांतर झालं आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांवर आता नवी नावं आपण देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे.

त्यामुळे नावांची जुनी यादी रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदेंचं सरकार आता नवीन नावं सुचवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT