Eknath Shinde Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2023 : 'त्यांचे' चेहरे बघण्यासारखे झाले होते; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर ताशेरे

संतोष कानडे

Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २०२३-२४चा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी काहीना काही देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे.

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मुंबई, शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आलेली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अर्थसंकल्पामधून दिलासा दिलेला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, हा अर्थसंकल्प इतका सर्वसमावेशक आहे की विरोधकांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. त्यांना काय बोलावं हे कळत नव्हतं. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

फडणवीसांचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला...

  1. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी

  2. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास

  3. भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास

  4. रोजगार हमीतून विकास

  5. पर्यावरणपूरक विकास

मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात शहरी भागातील नागरिकांना दिलासा देतानाच सरकारने कृषी क्षेत्रावर भर दिला आहे. मात्र मुंबईसाठी घोषित केलेल्या निधीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. फडणवीसांनी मुंबईसाठी एकून २ हजार ३१५.२ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. 

अर्थमंत्र्यांनी भाषा, कला, संस्कृतीसंदर्भात केलेल्या घोषणा

  • श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार

  • विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे

  • मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे

  • सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये

  • राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये

  • दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी 115 कोटी रुपये

  • कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना

  • विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त 10 कोटी रुपये

  • स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर सुळेंचा कुमावतांना फोन; परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण

Dombivli Politics: 'मोदी भेटीतून प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक'; ठाण्यात भाजप-शिंदे गटात सूक्ष्म सत्तासंघर्ष..

MPSC Result: सर्व टप्पे पार करूनही यादीतून वगळले; ‘राज्यसेवा परीक्षा-२०२४’च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

Shivraj Singh Chouhan : एक-दोन रुपये पीकविमा मिळणं ही थट्टा! अकोल्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल...

आनंदाची बातमी! सोलापुरातील १९ विद्यार्थी झाले सीए; १०८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, राज्यात वाजताेय डंका..

SCROLL FOR NEXT