Eknath Shinde On Devendra Fadnavis angry Sada Sarvankar maharashtra politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

'आम्ही दोघे दो दिल एक जान आहोत'; फडणवीसांच्या नाराजीच्या चर्चेवर CM शिंदे म्हणाले...

धनश्री ओतारी

दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील प्रभादेवी येथे शिंदे गट आणि शिवसेनेच्या झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या नाराजीवर मोठं विधान करत होणाऱ्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.(Eknath Shinde On Devendra Fadnavis angry Sada Sarvankar maharashtra politics)

पैठण येथील सभा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना फडणवीसांच्या नाराजी चर्चेवरही भाष्य केलं.

फडणवीस आणि मी एकसे भले दोन आहोत. आणि आम्ही दोघे दो दिल एक जान आहोत. एवढ लक्षात ठेवा. कारण, फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा अनुभव आहे. आता ते उपमुख्यमंत्री आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांनी आदेश दिल्या नंतर त्यांनी तो मानला. हा आदर्श आहे. एक मोठे उदाहरण आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीसांचे कौतुकही केले.

फडणवीसांच्या नाराजी चर्चेला उधाण...

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईत हा वाद मोठा पेटल्याचे पाहायला मिळाले. प्रभादेवी येथे शिंदे गट आणि शिवसेनेच्या झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रविवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत फडणनीस यांनी शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वादावर चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. शिंदे- फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT