CM eknath shinde on gram panchayat election result in meet with sarpanch maharashtra politics
CM eknath shinde on gram panchayat election result in meet with sarpanch maharashtra politics  esakal
महाराष्ट्र

Grampanchayat Election: 'अभी तो यह झॉंकी है, पिक्चर अभी बाकी है'; CM शिंदेंचा विरोधकांना इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे, या निवडणुकीत शिंदे गटाचे २४२ सरपंच निवडूण आले आहेत, आज ठाणे पालघर जिल्ह्यातील विजयी सरपंचांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान 'अभी तो यह झॉंकी है, पिक्चर अभी बाकी है' अश शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना इशार दिली आहे. ते ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या सदस्यांशी संवाद साधत होते.

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायत निवडणूक ही झॉंकी आहे, पिक्चर अभी बाकी है, खोका-खोका म्हणणाऱ्यांना मतदारांनी चांगला धक्का दिला आहे. यामधून त्यांनी बोध घ्यावा, असे आवाहन विरोधकांना केले आहे.

अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपने घेतलेल्या माघारीबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शरद पवार, राज ठाकेर यासोबतच प्रताप सरनाईक यांनी आवाहन केलं, उमेदवारानेही विनंती केली. त्यानंतर भाजपने मोठं मन दाखवून भाजप-सेना उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली, असं असून देखील चांगलं म्हणण्याचं औदार्य दाखवलं नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील जनता सुज्ञ आहे, भाजप आणि सेनेनं युती करत निवडणूक लढवली आणि जनतेने आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला, आमची भूमिका आता लोकमान्य झाली आहे. म्हणूनच हे चित्र आपल्याला पाहायाला मिळतं असे मुख्यमंत्री म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT