Eknath Shinde Latest Marathi News esakal
महाराष्ट्र बातम्या

आम्ही त्यांच्यासारखे मालक नाही; अजित पवारांच्या टीकेला CM शिंदेंचं प्रत्युत्तर

शपथविधीबाबत इतर पक्षाकडून दिशाभूल करणारी वक्तव्य केली जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकारने राज्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel) व्हॅट कमी केल्यानंतर विरोधी पक्ष नेेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खोचक टीका केली आहे. राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे सध्या राज्यात शिंदे आणि फडणवीस हे दोघे जणच महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्या खांद्यावर आहे अशी टीका केली आहे. अजित पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिरा भाईंदर (Mira Bhaindar) येथील शिवसेनेचे माजी 18 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Eknath Shinde News In Marathi)

शिंदे म्हणाले की, आम्ही अजित पवारांसारखे मालक नसून सेवक आहोत. त्यामुळेच आम्ही स्वतः गडचिरोलीला जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतल्याचे म्हटले आहे. यावेळी शिंदे यांनी राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सूचक विधान शिंदे केले आहे. शपथविधीबाबत इतर पक्षाकडून दिशाभूल करणारी वक्तव्य केली जात आहेत. त्यात काही तत्थ नसून लवकरच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आम्ही ज्या विचारांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्याला अनेक स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात ज्या घडामोडी पाहतोय त्यात बाळासाहेबांच्या, आनंद दिघे यांच्या भूमिकेला पुढे घेऊन जाणारं सरकार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, संघटना, सामान्य माणूस त्याला सुद्धा आम्ही घेतलली भूमिका, स्थापन झालेला सरकार यांनी आम्हाला मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT